मंत्री भुजबळ अडचणीत ; माफी मागण्यासाठी नोटीस !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापूर्वीच अजित पवारांनी फडणवीस व शिंदे यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले होते तर अजित पवारांसोबत आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात देखील घेण्यात आले आहे. आता मात्र अजित पवारांच्या एका मंत्र्याला नोटीस मिळाली आहे. यामुळे मंत्री छगन भुजबळ मोठ्या अडचणीत आले आहे.

- Advertisement -

मुंबई येथे एका मेळाव्यात भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये तत्काळ मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाची मागणी जातीच्या किंवा व्यक्तीविरुद्ध नाही, असे असताना देखील भुजबळ दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करत आहेत. १४ ऑक्‍टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची कुचेष्टा करणारी, मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली आहे. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात असूनही असे वक्तव्य करीत आहेत. मंत्रिपदाच्या शपथेचा भंग करत आहात, असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

समता परिषदेच्या मेळाव्यात भाषण करताना अंतरवली सराटी येथील सभेबद्दल कुचेष्टा करणारी वक्तव्ये त्वरित मागे घेऊन मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करू, असा इशारा देखील मंत्री छगन भुजबळ यांना या नोटीसमधून देण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी वकिलांमार्फत मंत्री छगन भुजबळ यांना नोटीस धाडली होती. आरक्षणासाठी अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलं असताना मराठा समाजाची चेष्टा करणारं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ हे करत आहेत. त्यांनी तात्काळ मराठा समाजाची माफी मागवी, अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे, असं काळे यांनी नोटीसमध्ये म्हटलं होतं.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS