साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत गेल्या काही महिन्यापासून भाजप, शिंदे गट व अजित पवार गटावर टीकास्त्र करीत असतांना आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
- Advertisement -
संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ हे ईडी, सीबीआयला घाबरून पळालेले लोक आहेत. यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? या गद्दारांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यांच्यावर कुणीतरी डरपोक नंबर एक असा सिनेमा बनवायला हवा. हे सर्व बंडखोर त्या सिनेमातील व्हिलन असतील. त्यांचे काहीही ऐकू नका. मलाही पडद्यामागे काय घडले? हे सर्व माहिती आहे. महाराष्ट्राला गुमराह करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत.
- Advertisement -