मंत्री भुजबळांची जी भूमिका तीच सरकारची ; मुख्यमंत्री शिंदे !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३

- Advertisement -

राज्यातील सरसकट सर्वच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ ठिकठिकाणी मेळावे घेऊन आपल्याच सरकारविरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यांना ओबीसी समाजातून मोठा प्रतिसादही मिळत आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी फोनवरून पुण्यात असलेल्या भुजबळांशी चर्चा करून त्यांच्या भूमिकेशी सरकार सहमत असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला भुजबळांचा विरोध नाही. सरकार इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे.

‘मराठा आरक्षणाला ना सरकारचा विरोध आहे ना छगन भुजबळांचा. फक्त हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढीच भुजबळांची भूमिका अाहे. सरकारचेही तेच मत आहे,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. भुजबळांची व सरकारची भूमिका सारखीच आहे. आमच्यात कुठलेही गैरसमज नाहीत.’ ‘दिव्य मराठी’शी बोलताना भुजबळ म्हणाले, ‘होय, मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनी ओबीसी व इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी होणार नाही असा शब्द दिला आहे. त्यावर मी समाधानी आहे.’

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS