भर बाजारातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – शहरातील सुभाष चौक परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे शुक्रवार ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या घटनेबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरातील भवानी मंदिर परिसरात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी ही आलेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. त्यावेळी तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेले आहे, अशी तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसात दिले. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Minor Girl

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS