साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात नेहमीच अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील गोविंदनगर भागात आई वडिल कामावर गेल्याची संधी साधत परप्रांतीय तरूणाने सात वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयित तरूणाचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार उदय (२० रा.बिहार) असे संशयित परप्रांतीय तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबियाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संशयित तरूण आणि पीडित मुलाचे कुटुंबिय एकाच बांधकाम साईटवर मोलमजूरीचे काम करतात. त्यामुळे त्याचे पीडित मुलाच्या घरी येणे जाणे होते. शुक्रवारी (दि.३) मुलाचे आई वडिल कामावर असल्याची संधी साधत संशयिताने घर गाठून हे कृत्य केले. मुलगा घरी एकटा असल्याचे बघून त्याने अंगलट करीत अनैसर्गिक कृत्य केले. रात्री घरी परतलेल्या आई वडिलांकडे मुलाने आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.