back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

आमदार मंगेश चव्हाण यांचा महाविकास आघाडीला अजून एक धक्का

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गट तट पक्ष न पाहता केलेल्या विकासकामांचा परिपाक…

- Advertisement -

धामणगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ग्रा. पं. सरपंच व सदस्यांचा भाजपा मध्ये पक्षप्रवेश

चाळीसगाव (sakshidar news) ; – तालुक्यातील धामणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक यांनी आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

- Advertisement -

सरपंच लुभान बळवंत जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सुभाषराव निकम, मनोज प्रभाकर निकम, दिलीप गोविंदराव जगताप, विकासो संचालक लालचंद जगन्नाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, संदीप प्रभाकर निकम, पुंडलिक माधवराव मोरे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा रुमाल टाकून सर्वांचे स्वागत केले.

यावेळी मार्केट संचालक कमिटी संचालक नवल पवार, माजी जि प सदस्य अनिल गायकवाड, सर्वोदय चे संचालक प्रशांत पाटील, भाजपा गटप्रमुख सुनील पवार, भूषण पाटील, शिवदास महाजन, ताराचंद मोरे आदी उपस्थित होते.

सदर पक्षप्रवेश वेळी प्रतिक्रिया देताना आमदार चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या ४.५ वर्षात विकासकामे करत असताना कुठल्याच गावात पक्ष, गट तट असा भेदभाव केला नाही. दोन गावांना जोडणारे रस्ते, सभामंडप, गावंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी भरघोस विकासकामे दिल्यामुळे इतर पक्षातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचा देखील भारतीय जनता पक्षाप्रति विश्वास वाढत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांनी प्रभावित होत धामणगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रवेश केला आहे. महाविकास आघाडी कडे विकासात्मक नेतृत्वाचा अभाव असल्याने आगामी काही दिवसात अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS