उमरगा । सुरज आबाचने । नाफेड सोयाबीन खरेदी केंद्र बारदाना उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आ. प्रवीण स्वामी यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या व्यवस्थाकाकडे निवेदनाद्वारे मागणी केले आहे.
व्यावस्थापकीय संचालकाकडे दिलेल्या निवेदनात सन २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र सरकार कडून नाफेड मार्फत शेतकऱ्यांचे सोयाबीन हामी भावदराने खरेदी करणे सुरू केले आहे. परंतु राज्यातील विविध खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नसल्याकारणाने खरेदी ठप्प झालेली आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव देणे करीता नाफेड मार्फत खरेदी होणे गरजेचे आहे. त्याकरीता तात्काळ विविध केंद्रावर बारदाना उपलब्ध करून देणे बाबत शेतकऱ्यांकडून विनंती करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करीत तातडीने बारदाना उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आ. प्रवीण स्वामी यांनी केले आहे.