अपुर्ण कामे 26 जानेवारीपर्यंत सुरू करा अन्यथा टोल बंद करण्याचा दिला इशारा
उमरगा । साक्षीदार न्युज । शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 सोलापूर हैद्राबाद वरील बाहय वळण रस्त्यावर शहरातील दत्तोपंत मनोहर पिस्के (वय- 65 ) यांचा अपघातात मृत्यु झाला तसेच अमोल अशोक मिरकले (वय 35 वर्ष) गंभीर जखमी झाल्याकारणाने उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रविण स्वामी अचानक आक्रमक झाले त्यांनी शेतकऱ्यांसोबत महामार्गावरील अपुर्ण कामामुळे अपघात होत असल्या कारणाने ठिय्या अंदोलन केले. यामुळे सदर महामार्गावरील वाहतुक ठप्प होवून दोन्ही बाजुनी वाहनांच्या मोठया रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व इतर अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देवून शहरालगतचे अपुर्ण कामे २६ जानेवारी २०२५ पर्यंत सुरू करणार असल्याचे अश्वासन दिल्या कारणाने सदर अंदोलन स्थगीत करण्यात आले.
वारंवार अंदोलने विनंत्या आणी पत्र व्यवहार करुन उमरगा शहरा लगतच्या बाहय वळण रस्त्याच्या अपुर्ण कामामध्ये अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आ. प्रविण स्वामी यांनी केला. अचानक केलेल्या ठिय्या अंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. दरम्यानच्या काळात अपुर्ण कामे सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील टोल प्लाझा येथे टोलबंद अंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येणार असल्याचा सजड इशारा आ. प्रविण स्वामी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिला.
या अंदोलनावेळी आ.प्रविण स्वामी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी गणेश पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे सुहास गवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे युवानेते डॉ. अजिंक्य पाटील,शेतकरी सेना जिल्हाप्रमुख विजयकुमार नागणे, शे.तालुकाप्रमुख विजय तळभुगे,अशोक सांगवे, रज्जाक अत्तार, सुधाकर पाटील,माहावीर कोराळे, रणधीर पवार,शहर प्रमुख राजेंद्र (जिडा)सुर्यवंशी, दत्ताभाऊ शिंदे, वैजनाथ काळे,सन्नी पाटील, तुकाराम पाटील परीसरातील शेतकरी, नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.