जळगाव खुर्द शिवारातील हॉटेल गारवा येथील मोबाईल टॉवरवरील २ लाख ८१ हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी गुरूवारी १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव खुर्द शिवारात खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर असून त्यावर बसविण्यात आलेल्या विविध तांत्रिक साहित्यापैकी २ लाख ७६ हजार रुपये किमतीचे एक युनिट, ५ हजार रुपये किमतीचे ओपीटी असे एकूण २ लाख ८१ हजार रुपये किमतीचे साहित्य असे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नेल्याची घटना बुधवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता तंत्रज्ञ सचिन विश्वनाथ सूर्यवंशी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गिरीश शिंदे करत आहेत.