यावल (प्रतिनिधी) ; – हिन्दु धर्माचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम मंदिराचे नवनियुक्त पुजारी महंत मोहीत पांडे यांचे आक्षेपार्य पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या अशा मनोविकृत विरूद्ध कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन फैजपुर विभागाचे पोलीस उप अधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांना देण्यात आले आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात युवकांनी म्हटले आहे की ,अभय महाजन राहणार कोळवद तालुका यावल हा एका राजकीय पक्षाचा सोशल मिडीया प्रमुख असून , या तरूणाने दिनांक १३ डिसेंबर रोजी संपुर्ण हिन्दु धर्माचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम मंदीराचे नवनियुक्त पुजारी महंत मोहीत पांडे यांच्याबद्दल अश्लील आक्षेपार्य मजकुर चे पोस्ट स्वताच्या लिगल फेसबुकवर व्हायरल करीत हिन्दु धर्माच्या भावना दुखाल्याचे कृत केले असुन,अशा विकृत प्रवृत्तीच्या तरूणा विरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे .
या पोलिस उपअधिक्षक डॉ कुणाल सोनवणे, यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर उमेरा रेवा फेगडे ,भुषण जगन्नाथ फेगडे ,उज्वल शिवानंद कानडे, राजेश कडू महाजन, उज्जैनसिंग राजपुत ,डॉ अभय गणेश रावते ,स्वपनिल संजय करांडे , व्यंकटेस प्रभाकर बारी, रितेश शिवाजी बारी , अनंत पंढरीनाथ बारी यांच्यासह आदी तरुणांच्या स्वाक्षरी आहे .