back to top
बुधवार, एप्रिल 9, 2025

Monsoon Maharashtra 2024: पुढील ३ दिवस महत्वाचे ! महाराष्ट्रात पावसाचे आगमन अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Monsoon Maharashtra: बहुप्रतिक्षित नैऋत्य मोसमी पावसाचे गुरुवारी, ६ जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले. सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर येथेही मान्सून दाखल झाला आहे.

- Advertisement -

Monsoon Maharashtra

मान्सून राज्याच्या उर्वरित भागात पोहोचण्यास अनुकूल असून 10 ते 14 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापेल. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जने, सोसाट्याचा वारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई जाणवत होती.

तसेच दुष्काळी स्थितीनंतर शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. शिवाय, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर आला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गुरुवारी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले.

- Advertisement -

Monsoon Maharashtra : महाराष्ट्रासह, मान्सून कर्नाटक, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, अरबी समुद्राचा काही भाग आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात पोहोचला. गुरुवारी मान्सूनची सीमा रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि इस्लामपूर (पश्चिम बंगाल) परिसरात होती.

- Advertisement -

यात लवकरच संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा समावेश होईल. Monsoon Maharashtra : मान्सून तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि बंगालच्या उपसागरातील इतर काही भाग व्यापेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 2 ते 3 दिवसांत मान्सून पुणे, मुंबईकडे प्रगती करेल.

अवकाळी पावसाने दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा दिला. मात्र, आता मान्सून दाखल झाला आहे. तसेच गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता. पुणे, जळगाव, सोलापूर, मुंबई, रत्नागिरी, धाराशिव, अकोला येथे गुरुवारी पावसाची नोंद झाली.

राज्यभर पावसाचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 10 जूनपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Gold Price Today | सोन्याच्या घसरणीला ब्रेक ! आज...

Gold Price Today   साक्षीदार न्युज । गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती, ज्यामुळे ग्राहकांनी सोन्याची खरेदी जोमाने केली होती. विशेषतः लग्नसराईच्या...

Tuljapur Drug Case | धक्कदायक : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात...

Tuljapur Drug Case  साक्षीदार न्युज । धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी (Drugs Case) प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील...

Gold Price | सोन्याच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी...

Gold Price साक्षीदार न्युज । सोनं खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरू शकते. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण...

RECENT NEWS

WhatsApp Group