साक्षीदार | १ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक तरुणांना नोकरी करण्याच्या अनेक संधी केद्र सरकारच्या माध्यमातून सध्या सुरु आहे. त्यात सर्वात महत्वाची मानली जाणारी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ अर्थात HAL कडून एकूण 84 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात काढण्यात आली आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पदानुसार 1,40,000 ते 2,40,000 रुपये महिना पगार मिळेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
सीनियर टेस्ट पायलट (एफडब्ल्यू) / टेस्ट पायलट (एफडब्ल्यू), मुख्य प्रबंधक (सिव्हिल), वरिष्ठ प्रबंधक (सिव्हिल), उप प्रबंधक (सिव्हिल), प्रबंधक (आयएमएम) I,उप प्रबंधक (आयएमएम), इंजिनियर (आयएमएम), उप प्रबंधक (वित्त), वित्त अधिकारी, उप प्रबंधक (एचआर), उप प्रबंधक (कायदा), उप प्रबंधक (विपणन), सुरक्षा अधिकारी, अधिकारी (अधिकारी भाषा), फायर ऑफिसर, इंजिनियर (सीएस) (कॉम्प्लेक्स ऑफिस) या पदांच्या रिक्त जागा ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’कडून भरल्या जात आहेत. संबंधित क्षेत्रात पीजी, बीई किंवा बीटेकची पदवी प्राप्त उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरतील. पात्र उमेदवारांचे वय किमान 35 आणि कमाल 53 वर्षे असले पाहिजे. राखीव संवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज पाठविण्यासाठी पता :
मुख्य प्रबंधक (एचआर), भर्ती अनुभाग
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
कॉर्पोरेट कार्यालय, 15/1 कब्बन रोड़
बैंगलोर – 560001