मोरया कंपनीच्या मालक, व्यवस्थापनाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;- एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये दोन कामगार ठार होण्यासह २२ जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनी मालक, व्यवस्थापनाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा स्फोट बुधवार, १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डब्ल्यू सेक्टरमध्ये झाला होता.

- Advertisement -

डब्ल्यू सेक्टरमधील मोरया ग्लोबल लिमिटेड कंपनीत आग लागल्याची घटना बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन बंब, रुग्णवाहिका दाखल झाल्या. सुरुवातीला जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र २ जण मध्ये अडकल्याची माहिती असल्याने त्यांचा शोध सुरू होता. त्यावेळी दुपारी दोन वाजता समाधान पाटील या कामगाराचा मृतदेह सापडला. मात्र आणखी एका कामगाराचा शोध लागत नव्हता. त्यामुळे शोध कार्य सुरूच होते. अखेर संध्याकाळी ६ वाजता दुसऱ्या कामगाराचीही मृतदेह सापडला. या स्फोटामुळे जवळच असलेल्या आर.जी. इंडस्ट्रीज या कंपनीलाही झळ बसली आहे.
कंपनीत स्फोट झाला त्या वेळी कंपनीत एकूण २६ जण होते. त्यापैकी २२ जण जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाला.

कंपनीतील स्फोटप्रकरणी कपिल राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक अरुण निंबाळकर, व्यवस्थापक लोमेश सुकलाल रायगडे, प्रशासकीय अधिकारी अनिल गुलाब पवार या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS