back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

“आईलाच असते घराची काळजी; घरासारखं जळगावचा संभाळ करेल” – जयश्रीताई महाजन यांचा भावनिक साद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव (सुनील भोळे) ; – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ आज दुपारी रामानंद नगर पोलिस स्टेशन परिसरात काढलेल्या प्रचार रॅलीने वातावरण अधिकच भावनावेधक बनवले. जयश्री महाजन यांच्या बोलण्यातून आणि नागरिकांसोबतच्या संवादातून त्यांचे शहराप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि निस्सीम बांधिलकी दिसून आली.

- Advertisement -

येथे क्लिक करा

👇🏽

- Advertisement -
Mother takes care of the house
Mother takes care of the house

रॅलीदरम्यान जयश्रीताईंनी मायेचा साद घालताना जळगावकरांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली. “आईला आपल्या घराची काळजी असते, ती थकत नाही, ती कधीच मागे हटत नाही, कारण तिला माहित असतं की तिच्या कष्टांनी तिचं घर सुरक्षित राहील. जळगाव हे घर सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्या मायेने आणि न थकता पार पाडीन. शहराला घडवण्याचं काम मी एक आई म्हणून करेन,” असे त्या भावूकपणे म्हणाल्या.

Mother takes care of the house

रॅलीदरम्यान महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. जयश्री महाजन यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक घराजवळ भगिनी मोठ्या उत्साहाने उभ्या होत्या. “ताई, तुमच्यासारखी माणसं आमच्यासोबत आहेत, याचीच आम्हाला खात्री आहे,” असे भावनिक उद्गार काही महिलांनी व्यक्त केले. महिलांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अक्षता ओवाळून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

Mother takes care of the house

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवला. जयश्री महाजन यांच्या भावनिक संवादाने आणि जळगावप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीने जनमानसाला एक नवी उभारी दिली आहे.

Mother takes care of the house

“जळगावच्या प्रत्येक कोपऱ्याचा मी सांभाळ करेन, प्रत्येकाच्या घराची एक जबाबदार माणूस म्हणून कर्तव्य पार पाडेन,” असा दृढनिश्चय जयश्री महाजन यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS