लाखो भक्तांवर शोककळा : ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | राज्यातच नव्हे तर परदेशात देखील भक्त व प्रसिद्ध असलेले राज्यातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे ८८ व्या वर्षी आज निधन झाले. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी तीन वाजेनंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी स्थान मिळवले होते. आपल्या निरुपणाच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्माच्या प्रचाराबरोबरच सामाजिक प्रबोधन देखील केले. त्यांचे रोखठोक विचार आणि आचरणाविषयी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला होता. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा होती. विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवले. बाबा महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देश -विदेशातून भक्त येत होते. मात्र, अलिकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहाता येत नव्हते. त्यांची ही कीर्तनाची परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS