जळगावातील दोन गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरात गंभीर गुन्हे दाखल असण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

- Advertisement -

शनिपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान, रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे या दोघांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दोघांच्या एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविण्यात आला व त्यांनी एमपीडीए कारवाईची मंजुरी देऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

त्यानुसार दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. शहजाद खान याची येरवडा, पुणे कारागृहात तर मयूर आलोणे याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, राजेश चव्हाण, पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, पोकों रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, किरण पाटील यांनी कारवाई केली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS