Chief Minister
जळगाव ( डॉ धर्मेश पालवे ) ; – Chief Minister मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केले जात असून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १४ महिन्यात १३ हजारांपेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना ११२ कोटी १२ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली असल्याची माहिती समोर येत आहे तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही या बाबत खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता मिळालेल्या जळगाव जिल्ह्यातील विविध गावामधील तब्बल दोन हजार रुग्णांच्या प्रतिक्रिया लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या असून आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जळगाव मार्फत ५ कोटी ६०लाख ८५हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असून आजवर एकूण ६७३ रूग्णांनी याचा फायदा घेतला आहे. हा एक अनोखा विक्रम असून त्याबद्दल निधी कक्षाच्या जळगाव टीमचे कौतुक करतानाच गरजू रुग्णांच्या मदतीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव मा.चिवटे यांनी जळगाव टीम साठी सूचना दिल्या आहेत.
लाभ मिळालेल्या व आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसलेले कृतज्ञतेचे भाव हेच अलौकिक समाधान देऊन गेल्याचे जिल्हा वैद्यकीय सहायता निधी कक्ष जळगाव यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जळगाव वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाचे कौतुक केले असुन. गरजूंना मदत देताना प्रसंगी सोपस्कार होत राहतील परंतु त्यांना वेळेवर मदत दिली जाईल अशी भावना देखील व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने गेल्या वर्षभरात १०० कोटींची मदत वितरित करण्याचा टप्पा सर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या कक्षाचे कौतुक केले. या कक्षाने केलेले अथक परिश्रम आणि रुग्णसेवेसाठी दाखवलेली तत्परता यामुळे हे साध्य झाल्याचे सांगत भविष्यातही गरजू रुग्णांना अशाच प्रकारे मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, निलेश देशमुख यांच्यासह त्यांच्या टीममध्ये काम करणारे सर्व वैद्यकीय सहाय्यक, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे .या कक्षाचा वैद्यकीय मदतीचा आलेख कायम चढता राहिला असून यापूर्वी ५० तर आता १०० कोटी वैद्यकीय मदत देण्याचा टप्पा सर केल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णासाठी हा निधी कक्ष हा एक आशेचा किरण ठरला आहे.