back to top
रविवार, एप्रिल 20, 2025

Mr. Nikhil workers permanent support ; स्व.निखिल यांच्या जनसेवेच्या मार्गावर चालण्यासाठी कार्यकर्त्यांची कायम साथ लाभावी -रोहिणी खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्व निखिल खडसे यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली सभेचे आयोजन

- Advertisement -

Mr. Nikhil workers permanent support  मुक्ताईनगर (sakshidar news) ; – स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणी येथील “ स्व .निखिल खडसे स्मृतिस्थळ” येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी स्व. निखिल खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी स्व निखिल खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून आणि दोन मिनिटे मौन बाळगुन निखिल यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी रोहिणी खडसे यांनी स्व. निखिल खडसे यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी त्या म्हणाल्या, स्व.निखिल खडसे हे मितभाषी व उत्तम संघटन कौशल्य आत्मसात असणारे व्यक्तिमत्व होते. आपल्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली.कोणी संकटात असणारा व्यक्ती मदत मागायला आला तर सर्व मतभेद बाजुला सारून ते संकटात असणाऱ्या व्यक्तीला नेहमी मदतीचा हात पुढे करत .समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता .कोणताही अभिनवेश न बाळगता ते प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत प्रत्येकाच्या सुख दुःखात ,गरजेच्या काळात धावुन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्याद्वारे त्यांनी जळगाव जिल्हाच नव्हे तर संपुर्ण राज्यात युवकांचा गोतावळा निर्माण केला होता.

- Advertisement -

आज राज्यभर दौरे करत असताना विविध ठिकाणी त्यांच्या मित्र परिवारातील सदस्य भेटून त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. आज स्व.निखिल भाऊ आपल्यात नसले तरी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या रूपाने ते सदैव आमच्या सोबत आहेत. निखिल खडसे यांनी दाखवलेल्या जनसेवेच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे त्यासाठी तुम्हा कार्यकर्त्यांची साथ सोबत सहकार्य लाभत आहे ती अशीच कायम ठेवावी. मुक्ताई सह सूतगिरणीच्या द्वारे स्थानिक युवक, महिलांना रोजगार देण्याचे त्यांचे स्वप्न होते त्यांच्या पश्चात त्यांचे हे स्वप्न पुर्ण करू शकले याचे मला आत्मिक समाधान असल्याचे रोहिणी खडसे यांनी निखिल खडसे यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले यावेळी त्या भावुक झाल्याने उपस्थितांनी त्यांना धिर दिला.

यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, शहराध्यक्ष राजेंद्र माळी,युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,भागवत पाटिल,साहेबराव पाटील,प्रविण पाटील,बापु ससाणे, प्रदिप साळुंखे,रउफ खान, निलेश भालेराव,राहुल पाटिल ,भैय्या पाटिल, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार, पक्ष पदाधिकारी व स्व.निखिल खडसे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Mr. Nikhil workers permanent support

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS