सौ. जयश्री महाजन मंगळवारी – धनत्रयोदशीला उमेदवारी अर्ज दाखल करणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ( सुनिल भोळे ) : – शहराच्या सर्वांगीण विकासाकडे पहिले पाऊल मी मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर टाकणार आहे. मंगळवारी मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असे प्रतिपादन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. जयश्री सुनिल महाजन यांनी सांगीतले.

- Advertisement -

 

मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ वाजता शिवतीर्थावरुन तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.गेल्या दहा वर्षातील भरकटलेला विकास मार्गावर आणण्यासाठी, निर्माण झालेला विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचेही प्रतिपादन जयश्री महाजन यांनी यावेळी केले. याप्रसंगी आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे, आपचे शहर संयोजक डॉ. सुनिल गाजरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
दोन दिवसापूर्वीच सौ जयश्री महाजन यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जाहीर करण्यात आली होती. त्याचे स्वागत शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS