साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे अनेक नेते आपल्या गडाला लावून शिंदेंची शिवसेना मजबूत करीत असतांना आता शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे २ दिग्गज नेत्यामध्ये वाद रंगला आहे. रामदास कदम यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कीर्तीकरांवर टीकेची झोड उठवत त्यांच्यावर त्यांच्या पत्नीशी गद्दारी केल्याची चिखलफेक केली आहे. गजानन कीर्तीकर यांनी स्वतःच्या बायकोशी गद्दारी केली. ते पुण्याला शेण खायला जातात, असे ते म्हणालेत.
रामदास कदम व गजानन कीर्तीकर यांच्यात गत काही दिवसांपासून राजकीय चिखलफेक सुरू आहे. शिंदे गटाच्या या दोन्ही नेत्यांत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघावरून वाद सुरू आहे. कीर्तीकरांनी सोमवारी रामदास कदम यांच्याविरोधात एक प्रेसनोट जारी केली होती. त्यात त्यांनी कदमांचा उल्लेख गद्दार म्हणून केला होता. ही टीका जिव्हारी लागल्यानंतर कदम यांनी मंगळवारी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. तसेच त्यांच्या खासगी जीवनावरही निशाणा साधला. रामदास कदम मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, तुम्ही व तुमचा मुलगा एकाच कार्यालयात बसता. तुमचा मुलगा तुमचा सर्व फंड वापरतो. मग एकमेकांविरोधात उभे राहण्याचे नाटक का करता? तुम्ही माझ्याविरोधात प्रेसनोट काढली. माझा उल्लेख गद्दार म्हणून केला. तुम्हाला माझ्याविरोधात बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. उलट तुम्हीच तुमच्या पत्नीशी गद्दारी केली. तुम्ही शेण खायला पुण्याला जाता.