back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

मुक्ताईनगरच्या विद्यमान आमदारांचे कोळी समाजाविषयीचे प्रेम फसवे – शरद कोळी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुक्ताईनगर (सुनिल भोळे) : – मुक्ताईनगर मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ ऐनपुर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते , धाडस संघटना अध्यक्ष शरद कोळी यांची प्रचार सभा संपन्न झाली. यात मनोगत व्यक्त करताना अरूणदादा पाटील, विशाल महाराज खोले यांनी मनोगत व्यक्त करून रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना नेते शरद कोळी हे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले कोळी विद्यमान आमदारांचे कोळी समाजा विषयीचे प्रेम हे फसवे आहे त्यांनी कधीच कोळी समाज बांधवांच्या आरक्षणाच्या, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला नाही. कोळी समाज बांधवांच्या प्रश्नांवर राज्यात सर्व प्रथम आ.एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत आणि त्यानंतर आता विधान परिषदेत आवाज उठवला कोळी समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण आणि जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी वेळोवेळी आग्रही मागणी केली.

- Advertisement -

Koli community

अनेक कोळी समाज बांधवांना पक्ष संघटनेपासून पंचायत समिति, जिल्हा परिषद, आणि सहकारी संस्था मध्ये लाल दिव्याच्या गाडी पर्यंत नेतृत्वाची संधी दिली. याउलट विद्यमान सत्ताधाऱ्यांनी माझ्या सारख्या कोळी समाजातील गरीब घरातील तरुणाचे नेतृत्व पुढे येऊ नये यासाठी माझ्या भाषणावर सभेवर बंदी घातली, खोटे गुन्हे दाखल करून मला जिल्हा बंदी करून नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

Koli community

जेव्हा जळगाव आणि मुक्ताईनगरला कोळी समाज बांधव उपोषणाला बसले तेव्हा विद्यमान लोकप्रतीनिधींकडून याकडे आधी दुर्लक्ष केले गेले शेवटी लोकआग्रहावरून उपोषणाला कोरडी भेट दिली. आ. एकनाथराव खडसे आणि ॲड रोहिणी खडसे यांनी सर्व प्रथम या उपोषणाला भेट देउन आपला आणि पक्षाचा पाठिंबा दर्शवला. एकनाथ खडसे आणि ॲड रोहिणी खडसे या कायम कोळी समाज बांधवांच्या पाठीशी आहेत. विद्यमान सत्ताधारी यांना शेतकऱ्याच्या प्रश्ना बाबतीत संवेदनशीलता नाही या सरकारच्या काळात सोयाबीन, मका कापुस, केळी कोणत्याच शेतमालाला योग्य भाव नाही दुसरीकडे खते बियाणे यांची मोठी दरवाढ केली यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसुन सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला असुन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचे काम शिंदे सरकारने केल्याची टिका शरद कोळी यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले रोहिणी खडसे यांना तुम्ही विजयी करा त्यांना मंत्री बनवण्याचे काम महा विकास आघाडी सरकार करणार असल्याचे सांगून रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी आमदार अरूण दादा पाटील, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, विशाल महाराज खोले, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी प स सदस्य दिपक पाटिल,शिवसेना नेते मनोहर खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश पाटील, पवनराजे पाटील, रामभाऊ पाटील, संजय पाटील, सचिन महाले, दत्ता पाटील, काशिनाथ पाटील, भगवान महाजन, अमोल महाजन, किशोर पाटील, अरविंद महाजन, सलमान खान, हैदर भाई , अक्षय महाजन, मोहन कचरे, पवन कपले, गणेश बाविस्कर, आत्माराम कोळी,निलेश पाटिल, गफुर कोळी, राजेंद्र कांडेलकर, नितिन पाटिल,मंदार पाटिल, मधुकर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS