Municipal Election | महापालिका निवडणुकांसाठी राजकीय गणिते बदलली! मुंबईत ठाकरे एकत्र, पुण्यात पवारांची युती ठरली?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Municipal Election | साक्षीदार न्यूज | राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रमुख पक्षांच्या भूमिकांमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. मुंबई महापालिकेची सत्ता टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे स्पष्ट होत असतानाच, पुण्यातही पवार गटांमधील जवळीक वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

मुंबईसाठी मनसे आणि ठाकरे गटाची शिवसेना युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उद्या दुपारी 12 वाजता याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे संकेत मिळाल्यानंतर आता राज्याच्या राजकारणाचे लक्ष पुण्याकडे वळले आहे.

पुण्यात पवार एकत्र येणार?

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. 26 डिसेंबर रोजी या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

- Advertisement -

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 26 तारखेला सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तोपर्यंत कुणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नका.” याच पार्श्वभूमीवर उद्या अजित पवार मुंबईत बैठक घेणार असल्याची माहिती आहे.

विरोध आणि इशाऱ्यांचा फारसा परिणाम नाही

दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी युती झाल्यास पक्षातून राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. मात्र या वक्तव्याचा पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर फारसा परिणाम झालेला नसल्याचे चित्र आहे.

पुण्यासाठी आघाडीचा प्रस्ताव

पुणे महापालिकेत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आघाडी उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या आघाडीत दोन्ही राष्ट्रवादीसोबतच ठाकरे गटाची शिवसेनाही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रस्ताव अजित पवारांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

या प्रस्तावावर अजित पवार काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे पुण्यात महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली असून, 25 किंवा 26 डिसेंबर रोजी युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग

प्रशांत जगताप यांच्या इशाऱ्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची एक गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीला शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, विशाल तांबे, तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे उपस्थित आहेत.

स्थानिक नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्यानंतर याची माहिती वरिष्ठ पातळीवर पाठवली जाणार आहे. पुणे महापालिका निवडणूक, जागावाटप आणि आघाडीचे गणित यावर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

31 डिसेंबरसाठी घरीच दारूची पार्टी करता तर मग सावधान! घरात किती दारू ठेवू शकता ? वाचा नियम
 गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करावी का? शास्त्र काय सांगते, जाणून घ्या संपूर्ण सत्य
नगराध्यक्षांना किती पगार मिळतो? A, B, C वर्गातील नगरपरिषदांचे मानधन आणि भत्त्यांचा सविस्तर खुलासा
 दारू पिल्यानंतर या 3 गोष्टी चुकूनही खाऊ नका; हँगओव्हर वाढतो आणि तब्येत बिघडू शकते

Municipal Election

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS