Jalgaon Municipal Office साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । जळगाव शहरातील मनपा संबंधित एक अधिकाऱ्याला मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमधून बाहेर आधार देत दुचाकीवर बसविण्यात आले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार हॉटेलच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात तर कैद झालाच शिवाय उपस्थित नागरिकांनी देखील पहिला. भर दिवसा एका अधिकाऱ्याचे हे वागणे बरे नव्हे म्हणत सर्वांनी आपापली वाट धरली. रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलच्या बाहेर हा प्रकार घडला.
जळगाव शहरातील महानगरपालिका संबंधित असलेला एक अधिकारी शुक्रवारी दुपारीच हॉटेलमध्ये मित्रांसह मद्यपान करण्यासाठी बसला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ते सर्व हॉटेलच्या बाहेर आले असता तो चालण्याच्या देखील अवस्थेत नव्हता. मित्रांनीच त्याला आधार देत सावरले आणि त्याच्या महागड्या दुचाकीपर्यंत पोहचवले. त्या अधिकाऱ्याला दुचाकीवर बसता देखील येत नसल्याने गोची फसली.
अधिकाऱ्याची अवस्था आणि दुचाकीवर बसता येत नसल्याची गंमत पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा होऊ लागली. अखेर दोघांनी त्या अधिकाऱ्याचे पाय धरून त्याला दुचाकीवर बसविले आणि दुसरा सहकारी चालक म्हणून बसला. दुचाकी चालकाच्या पाठीवर डोकं टेकवून अखेर तो अधिकारी घराच्या दिशेने रवाना झाला. जवळपास २५ मिनिटे हि सर्व गंमत सर्व पाहत होते.