जळगाव := मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेची (वय ३८) शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना महालखेडा शिवारात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.मालताबाई मनोज खाडे ( वय अंदाजे ३७ ) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
👇🏼हा व्हिडिओ जरूर बघाल👇🏼
आम्ही त्यांना घरी बोलवायला गेलो नव्हतो
मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील एकत्र
महालखेडा येथे राहणारी महिला शेतात सकाळी काम करायला गेली होती. काम आटोपून घरी परतत असताना त्यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महिला घरी न परतल्याने कुटुंबियांनी शेतात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून हत्या केल्याने महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबत एका पुरुषाचे अनैतिक संबंध होते. त्याच मुद्द्यावरून महिलेसोबत त्याचा वाद व्हायचा. वादातूनच त्याने दगडाने ठेचून आणि शरिरावर, गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.