Murder in Jalgaon Jail | जळगाव (साक्षीदार न्युज) ; – भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्यासह पाच जणांची काही वर्षांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली काही या हत्येमधील आरोपी हे जळगाव जेलमध्ये आहे या आरोपींमध्ये आपापसात झालेल्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना हि रात्री घडली.
या संदर्भातील माहिती अशी कि , भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात ( वय ५५) यांच्यासह पाच जणांची २०१९ मध्ये भुसावळात अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर करण्यात आलेल्या हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेले होते . त्यामुळे भाऊसावळ शहरात दहशतीचे वातारण निर्माण झाले होते . जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते . या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.
उमेद अभियानात मोठा घोटाळा उघडकीस येणार ?
या हत्येमधील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसऱ्या आरोपीबरोबर काल दुपारी भांडण झाले होते . दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या आरोपीने याने राजू उर्फ मोसिन शेख अजगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला चढविला आणि त्याला गंभीर जखमी केले. जखमी असगरला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले .
जळगाव कारागृह हे आधी देखील अनेक गैरकृत्यांमुळे नेहमीच चर्चेत आहे . आता तर चक्क जेलमधील कैद्याचा थेट खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई होण्याचे देखील बोलले जात आहे .
दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत असगर याचा मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. तर पोलीसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.