Murder In Jalgaon 2024 : जुन्या वादातून झाला तरुणाचा खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Murder In Jalgaon – साक्षीदार न्यूज | २२ मे २०२४ | जळगाव शहरातील कालिंका माता चौकाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्त्या करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. किशोर अशोक सोनवणे रा.कोळीपेठ असे मयताचे नाव आहे.

- Advertisement -

Murder In Jalgaon

Murder In Jalgaon

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोळीपेठ परिसरात राहणारा किशोर अशोक सोनवणे हा तरुण मक्तेदारीचा आणि इतर व्यवसाय उद्योग करीत होता. बुधवारी सायंकाळी कालिंका माता मंदिर चौकाजवळ असलेल्या एका चायनीज विक्रेत्यासोबत वाद झाला होता. काही वेळानंतर तो जवळच असलेल्या हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता.

- Advertisement -

रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये आलेल्या काही तरुणांनी जुना वाद उकरून काढत किशोरवर हल्ला चढवला. धारदार शस्त्र आणि लाकडी दांड्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी गर्दी करीत एकच आक्रोश केला.

मयत किशोर सोनवणे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, पोलिसांनी एक संशयितला ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष (Murder In Jalgaon)
जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ढाबे आणि हॉटेलमध्ये विनापरवाना मद्य सेवन आणि विक्री केली जाते. रात्री १० वाजेनंतर देखील बऱ्याच हॉटेलमध्ये हे प्रकार बिनधास्त सुरु असतात. जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे कानाडोळा करीत असल्यानेच अवैध प्रकार वाढू लागले आहेत. आज घडलेल्या घटनेत देखील योग्य वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असती तर अनुचित प्रकार रोखता आला असता. पुण्यात जसे अनधिकृत बार आणि पब सुरु आहेत तसेच जळगावात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशिर्वादाने ढाबे आणि हॉटेल सुरु आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS