Jalgaon crime | जळगांवच्या तरुणाचा भुसावळात खून | मारेकरी राजकारणी व्यक्तीचा मुलगा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon crime | साक्षीदार न्यूज | जळगाव जिल्ह्यात खुनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात नाना पाटील या तरुणाचा खून झाल्यानंतर आज पुन्हा भुसावळ शहरात खुनाची रक्तरंजित घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील कंडारी गावाजवळ रविवारी रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली. या वेळी दोन तरुणांमध्ये चालत्या गाडीतील वाद झाला वाद झाला आणि वादाचे रुपांतर हे खुनात झाले .

- Advertisement -

या घटनेत जितेंद्र कोळी (वय ३५, रा. जळगाव) हा तरुण गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेत जितेंद्रला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यास दाखल केल्यावर मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मारेकरी हा जळगाव शहरातील एका राजकीय नेत्याच्या मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, सलग दोन दिवसांत जळगाव व भुसावळ भागात झालेल्या खुनांच्या घटनांमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून आरोपीचा शोध वेगाने घेतला जात आहे.

Jalgaon crime

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS