साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना दिवाळीच्या दिवशी घडल्याने नंदुरबार शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अमृत चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाची हत्या झाली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री घटना घडल्यानंतर या घटनेची बातमी आज सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांची माेठी गर्दी जमली.
मिळालेल्या माहितीनूसार हत्या झालेल्या युवकाचे नाव योगेश चौधरी असे आहे. दरमयान या हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पाेलीस घटनेचा तपास करीत आहेत. आज सकाळपासून घटनास्थळी पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त तैनात आहे. सध्या घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. पाेलीस काही लाेकांकडून घटनेची माहिती घेत आहेत.