back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

बिग ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील कैद्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार न्युज | ६ फेब्रुवारी २०२४ | शहरातील शनिपेठेत शनिमंदिर समोरील एका घराच्या तळमजल्यावर १८ एप्रिल २०१७ रोजी पहाटे पूर्ववैमनस्यातून प्रवीण माळी या तरुणाचा खून करण्यात आला होता . या प्रकरणातील संशयीत भीमा उर्फ पंकज वाणी याचा जलगाव कारागृह बंदिवान कैदी म्हणून उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या बाबत सविस्तर वृत्त असे कि , शनी मंदिराजवळ असलेल्या ओंकार वाणी यांच्या घराच्या तळमजल्यात मंगळवार दि.१८ एप्रिल २०१७ रोजी मध्यरात्रीपासून प्रवीण उर्फ नितीन सुरेश माळी (वय २८, रा. सत्यम पार्क), भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय २६, रा. विसनजीनगर) व राहूल जयराम सपकाळे (वय २३, रा. काचंननगर) हे तिघे पत्ते खेळत बसले होते. जुन्या वादातून पहाटे ४ वाजेच्या सुमारास भीमाने प्रवीणचा डोक्यात दगड मारून खून केला होता. त्यानंतर पंकज आणि राहूल दोघे फरार झाले होते.

गुन्ह्यातील मुख्य संशयित पंकज हा बुधवारी पहाटे घरी गेला. त्याने त्याच्या आईला भुसावळ येथे पाठवले. त्यानंतर जळगावला थांबणाऱ्या एका एक्स्प्रेस रेल्वेने मुंबईकडे पसार झाला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासात त्याला सीएसटी रेल्वेस्थानकातून अटक केली होती. तर राहुल सपकाळे याला असोदा रस्त्यावरून अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

गुह्यातील मुख्य संशयीत भीमा उर्फ पंकज अशोक वाणी वय – ३७ याला जुनाट टिबी आणि फिट्स येण्याचा आजार होता. गेल्या काही वर्षापासून तो कारागृहातच होता. टीबीच्या आजारामुळे गेल्या ६ महिन्यात प्रकृती खालावल्याने त्याला १० ते ११ वेळा उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दि.३ फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

Murder Prisoner Hospital

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS