back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

संगीतकला मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त… ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उरुळी कांचन (साक्षीदार न्युज) : – प्राचीन काळापासून संगीत कला जोपासल्या जात आहे .आदिमानव आपल्या रक्षणासाठी ढोलाचा वापर करीत असत व त्यातून आनंद मिळवत असत. भगवान शंकरांचे तांडव नृत्य हे एक संगीताचाच भाग आहे.ही उपजत कला नटेश्वर पासून सुरू झालेली आहे. संगीताला अत्यंत प्राचीन इतिहास आहे.आदिमाया शक्ती सरस्वतीचा ह्या कलेला आशीर्वाद असतो.संगीत ईश्वराची खास देणगीअसुन ती उपजत नैसर्गिक कला आहे

- Advertisement -

सुखदुःखात संगीताचे खूप महत्त्व कळते.नादयुक्त गायन, वादन, नृत्य, इत्यादीचा समावेश संगीत कलेमध्ये होतो .अन्न ,अक्षर, आरोग्य, आणि आचरण ह्या मनुष्याला मूलभूत बाबी आवश्यक असुन मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत अत्यंत उपयुक्त व महत्वाचे असते.संगीत मनुष्याला मानसिक स्वास्थ्य प्रदान करते ,असे मत ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार ह भ प डॉ. रवींद्रजी भोळे यांनी येथे व्यक्त केले.सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था अंतर्गत साने संगीत लोककला मंच वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.आयोजन शिवराज ज्ञानोबा साने यांनी जिजामाता सभागृह उरुळी कांचन याठिकाणी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभेदार मेजर निवृत्ती आर्मी बाळासाहेब पाटोळे उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच अमित बाबा कांचन, पंचायत समितीचे माजी उपसभापती हेमलता बेडेकर, अभिनेता सतीश रावजादे, साजिद मुलानी, संस्थेचे अध्यक्ष रेखा शिवराज साने, जिल्हा अध्यक्ष विजय तुपे, प्रभाकर खरात, जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे, अरुण खरात, भीमराव घायवण, सुरवसे, शिंदे, दत्ता सोळुंके, विकास साने आदी मान्यवर उपस्थित होते. निमंत्रित पत्रकार बांधवांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यामध्ये सहदेव खंडागळे, सुवर्णा कांचन दै सकाळ प्रतिनिधी हवेली, दैनिक सामानाचे प्रतिनिधी भाऊसाहेब महाडिक, सुनील तुपे, सुरेश वाळेकर, संतोष वाघमारे, प्रकाश म्हस्के, आनंद वैराट, सिद्धार्थ ढाले, अनिल गायकवाड, शिवाजी पारेकर, सदाशिव कांबळे तसेच सर्व संगीत कलावंत क्लास घेणारे विद्यार्थ्यांचाही व कला मंचाचे सर्व सदस्य, पालक यांचाही सत्कार समारोह संस्थेच्या अंतर्गत करण्यात आला. कार्यक्रमाची रूपरेषा मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामूहिक स्वागत गीत, शिवछत्रपती शिवाजी महाराज पोवाडा, अभंग, भावगीत, भक्तीगीत, महापुरुष गीत, जनजागृतीच काही गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. संस्थेच्या अंतर्गत घेण्यात येणारे उपक्रम टेलरिंग प्रशिक्षण देणे, ‘झाडे लावा झाडे जगवा’ संगीत कला प्रशिक्षण देणे याबाबत माहिती प्रास्ताविक मध्ये शिवराज साने यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव खंडागळे यांनी केले. आभार अमोल भोसले यांनी मानले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS