Nagaradhyaksha Municipal Council | नगराध्यक्षांना किती पगार मिळतो? A, B, C वर्गातील नगरपरिषदांचे मानधन आणि भत्त्यांचा सविस्तर खुलासा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Nagaradhyaksha Municipal Council | साक्षीदार न्यूज | राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर अनेक ठिकाणी नव्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला आहे. यानंतर नागरिकांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे— नगराध्यक्षांना नेमका किती पगार दिला जातो?

- Advertisement -

प्रत्यक्षात नगराध्यक्षांना पगार नसून त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन शासनाकडून थेट दिले जात नसून, संबंधित नगरपरिषदेच्या फंडातून अदा केले जाते. नगरपरिषद फंडामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर स्थानिक करांतून जमा होणारा निधी समाविष्ट असतो.

नगरपरिषदांची वर्गवारी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशी करण्यात आलेली असून, त्यानुसार नगराध्यक्षांच्या मानधनात फरक असतो. ‘अ’ वर्गातील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना सर्वाधिक मानधन दिले जाते, तर ‘क’ वर्गातील नगरपरिषदांमध्ये हे मानधन तुलनेने कमी असते.

- Advertisement -

शासनाच्या नियमानुसार

अ वर्ग नगरपरिषद नगराध्यक्षांना दरमहा २५ हजार रुपये मानधन आणि ३६ हजार रुपये अतिथ्य भत्ता दिला जातो.
ब वर्ग नगरपरिषद नगराध्यक्षांना २० हजार रुपये मानधन आणि २४ हजार रुपये अतिथ्य भत्ता मिळतो.
क वर्ग नगरपरिषद नगराध्यक्षांना १५ हजार रुपये मानधन आणि १८ हजार रुपये अतिथ्य भत्ता दिला जातो.

अतिथ्य भत्ता म्हणजे नगराध्यक्षांच्या पदाच्या अनुषंगाने येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य, बैठकीदरम्यानचा खर्च, भोजन, निवास व इतर आवश्यक सुविधांसाठी दिली जाणारी आर्थिक मदत होय. याशिवाय, ज्या दिवशी अधिकृत बैठक आयोजित केली जाते, त्या दिवशी नगराध्यक्षांना १०० रुपये बैठक भत्ता देखील दिला जातो.

एकूणच पाहता, नगराध्यक्षांना मिळणारे मानधन आणि भत्ते हे नगरपरिषदेच्या वर्गवारीवर तसेच स्थानिक निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. त्यामुळे “नगराध्यक्षांचा पगार” ही संकल्पना प्रत्यक्षात मानधन व भत्त्यांपुरतीच मर्यादित आहे, हे स्पष्ट होते.

दारू पिल्यानंतर या 3 गोष्टी चुकूनही खाऊ नका; हँगओव्हर वाढतो आणि तब्येत बिघडू शकते
जानेवारी 2026 पासून रेशनमध्ये मोठा बदल! अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना किती धान्य मिळणार ? वाचा सविस्तर
पुणे ते जळगाव अवघ्या ३ तासांत? नव्या…

Nagaradhyaksha Municipal Council

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS