नागदुली शिवारात अंगावर वीज कोसळल्याने तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव : एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारातील शेतात अचानक वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील (वय ३५,रा. नागदुली, ता. एरंडोल) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.परिवारासह वास्तव्यास आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्यांचे नागदुली शिवारात शेत आहे. दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळी श्रीकांत हा वडील भिका लक्ष्मण पाटील आणि काही मजुरांसोबत शेतातील चारा कुट्टी जमा करत होते. त्यावेळी श्रीकांत पाटील हा लाकूड घेण्यासाठी बाजूला जात असताना अचानक त्याच्या अंगावरमृत्यू झाला. यानंतर त्याच्या वडिलांनी आरडाओरड केली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. दरम्यान, एकुलता एक मुलगा गेल्याने वडील व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याबाबत पोलिसांत अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, दोन मुली, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS