Dr. Babasaheb Ambedkar Jayanti | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत दुर्दैवी घटना, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti साक्षीदार न्युज । नाशिक । डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. मिरवणुकीत सहभागी असलेल्या 23 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव नितीन रणशिंगे असून, तो पेठ रोडवरील फुलेनगर परिसरातील रहिवासी होता.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, मिरवणुकीदरम्यान डीजे सुरू असताना नितीनच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. उपस्थितांनी त्याला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैद्यकीय सूत्रांनुसार, नितीनला यापूर्वी क्षयरोगाचा त्रास होता. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डीजे च्या मोठ्या आवाजामुळे ही घटना घडली की अन्य आरोग्यविषयक कारणांमुळे, याचा खुलासा पोस्टमॉर्टम अहवालानंतर होण्याची शक्यता आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.

- Advertisement -

या घटनेमुळे मिरवणुकीतील उत्साहावर विरजण पडले. स्थानिकांनी डीजे च्या मोठ्या आवाजाबाबत चिंता व्यक्त केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.

आईनेच स्वत:च्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवला
शिक्षण विभागात 570 बोगस शिक्षकांचा पर्दाफाश, 200 कोटींचा घोटाळा

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS