Godavari Hospital | गोदावरी हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर हलगर्जीमुळे तरुणाचा मृत्यू; नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Godavari Hospital नशिराबाद | साक्षीदार न्यूज | साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

स्वप्नील रोहिदास बनसोडे असे मृत तरुणाचे नाव असुन कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात कमरेत वेदना होत असल्याने स्वप्नील बनसोडे यांनी गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र घरी आल्यानंतर शस्त्रक्रियेच्या जागी सूज येऊन पू साचल्याने प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, आवश्यक प्राथमिक तपासण्या जसे एक्स-रे, एमआरआय आदी न करता शस्त्रक्रिया करण्यात आली. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी स्वप्नील यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी किडनी व लिव्हरवर सूज आल्याचे सांगितले.

कुटुंबीयांनी दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली असता ती देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, स्वप्नील यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

स्वप्नील बनसोडे यांचा मृत्यू हा संबंधित रुग्णालय व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच व्हिसेरा नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवावा व शवविच्छेदन इन-कॅमेरा करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, संबंधित रुग्णालय व जीएमसीकडून कागदपत्रे ताब्यात घेऊन तपास केला जाणार आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात येणार असून, वैद्यकीय समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी दिली.

Godavari Hospital

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Tadvi Bhil Community | भव्य सामूहिक विवाहाची घोषणा! परसाडे...

Tadvi Bhil Community यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील परसाडे बु येथे आदिवासी तडवी भिल समाजासाठी भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे....

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

RECENT NEWS