Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले आहे. चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. वरची आळी, नशिराबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक डमी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार २३ मार्च २०२६ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष ‘काँबिंग ऑपरेशन’ राबविण्यात येत होते. या मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार संशयित चेतन पाटील हा गावठी कट्ट्यासह बसस्थानक परिसरात वावरत आहे.

मिळालेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ बसस्थानक परिसरात सापळा रचला. रात्री ८:२० च्या सुमारास संशयित चेतन पाटील पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक बनावट (डमी) कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

वाळू चोरीचं ‘रेट कार्ड’ पोलिसांनीच केले व्हायरल आलं समोर! कुणाला किती ‘पेढे’ आणि कुणाचं ‘रिचार्ज’?

महापालिकेच्या टेंडरवरून जळगावात तुफान राडा; पोलीस ठाण्यात मारहाण

चोपडा तालुक्यातील अकुलखेड्यात थरार! इन्स्टाग्रामवरील प्रेम प्रकरणाचा रक्तरंजित अंत! 😱

Nashirabad Police

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

RECENT NEWS