भुसावळ ; – दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी जयपुर येथे सुखदेव दादा गोगामेडी यांची निवासस्थानी अज्ञात मारेकरांनी गोळ्या घालून हत्या केली होती त्यांचे पडसाद संपूर्ण भारतात उमटले मारेकऱ्यांना अटक करून फाशी द्या किंवा एन्काऊंटर करा अशी एकमुखी मागणी सकल राजपूत समाजाच्या वतीने संपूर्ण भारतात करण्यात आली.
त्या अनुषंगाने सुखदेव दादा गोगामेडी यांना आज पूर्ण दहा दिवस झाले म्हणून भुसावळ तालुका राजपूत समाजाच्या वतीने स्वर्गीय सुखदेव दादा गोगामेडी यांचा दशक्रिया विधी धार्मिक विधिवत पूजा करून समाज बांधवांनी मुंडन करून पवित्र तापी मातेच्या तीरावर केला प्रसंगी समाज बांधवांनी सुखदेव दादा गोगामेडी हे हिंदू धर्मा रक्षक, गौरक्षक, व राजपूत समाज अध्यक्ष असल्याने त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे म्हणून संपूर्ण समाज बांधवांनी दादांची पुण्यतिथी व जयंती व सरकार दरबारी शासकीय सुट्टी जाहीर व्हावी अशी एकमुखी मागणी राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली यावेळी श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, युवक जिल्हाध्यक्ष संदीप सिंह राणा, आनंदा पाटील, आकाश राजपूत, जय राजपूत, वैभव राजपूत, किशोर राजपूत, सोनू राजपूत, बापू राजपूत, पंकज राजपूत, चेतन राजपूत, विजय पाटील, देवेंद्र राजपूत, दीपक राजपूत, रोहित महाले युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.