Natyarang Jalgaon ; २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य अंतिम फेरीत नाट्यरंग जळगावच्या तीन कलावंतांनी पटकावली पारितोषिके

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Natyarang Jalgaon साक्षीदार न्युज : – बीड येथे झालेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत शहरातील नाट्यरंग थिएटर्सने सादर केलेल्या ‘म्हावरा गावलाय गो’ या बालनाट्यातील तीन कलावंतांना पारितोषिके मिळाली आहेत.

- Advertisement -

अंतिम स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पुणे या संस्थेच्या आभाळमाया या नाटकाला प्रथम, चिल्ड्रन्स अकॅडमी मालाड या संस्थेच्या सत्य जे विलुप्त या नाटकास द्वितीय तर साईस्पर्श संस्था ठाणे यांच्या ये गं ये गं परी या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. अंतिम फेरीच्या वैयक्तिक पारितोषिकांमध्ये नाट्यरंग जळगावच्या म्हावरा गावलाय गो या अमोल ठाकूर लिखीत दिग्दर्शित बालनाट्याकरिता संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक दर्शन गुजराथी यांना तर शर्वा जोशी व श्लोक गवई यांना अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. दि. ५ मार्च ते १० मार्च या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे झालेल्या २० व्या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातील केंद्रावरून पारितोषिक विजेत्या ठरलेल्या २४ बालनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमेश थोरात, रमेश भिसीकर, गजानन दांडगे, ज्योती रावेरकर, माणिक जोशी यांनी काम पाहिले होते.

या विजेत्या कलावंतांचे सांस्कृतिक कार्यचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जळगावातील रंगकर्मींतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

Natyarang Jalgaon

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS