Navratri festival ; जी.एम.फाउंडेशन, आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे नवरात्र उत्सवाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

तरुणाईने सर्वाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

- Advertisement -

Navratri festival जळगाव ( साक्षीदार न्युज ) : – येथील जी.एम. फाउंडेशन, आमदार राजूमामा भोळे, शिवगंध व पेशवा ढोलपथक यांच्यावतीने शहरातील शिवतीर्थ येथे नवरात्रोत्सवाचे दि. ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्या गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन शहरात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. तरुणाईला प्रोत्साहन म्हणून जी.एम.फाउंडेशन, आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने तसेच शिवगंध व पेशवा ढोल पथक यांच्या सहकार्याने शिवतीर्थ मैदानावर नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात मुंबई येथील रीदमॅटिक हिरोज बँड (ऑर्केस्ट्रा), भव्य दिव्य लाईट शो, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, भव्य मंडप याची सुविधा असून महिलांसाठी सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आमदार राजूमामा भोळे यांनी शिवतीर्थ मैदानावर जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यानुसार विविध सूचना केल्या. नवरात्रोत्सव संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उत्सवामध्ये दांडिया किंग, दांडिया क्वीन, गरबा किंग, गरबा क्वीन असे विजेते निवडण्यात येणार असून याशिवाय इतर आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. त्यासाठी उत्सवाची पास ही आरक्षित करावी लागणार असून तरुणाईने मोठ्या संख्येने उत्सवामध्ये सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी (८८८८२८००९२, ८८५५००७९६४) संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Navratri festival

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS