साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | देशभरातील काही राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना आज छत्तीसगडमधील सुकमा येथे निवडणूक सुरु असतांना कर्तव्यावर तैनात निमलष्करी जावन आणि नक्षलवादी नक्षलवाद्यांमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यात तीन जवान जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.ताडमेटला आणि डुलेड गावांदरम्यानच्या जंगल भागात हा गोळीबार झाला आहे. हा गोळीबार सुमारे 20 मिनिटे चालले, असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रापासून सुमारे 200 मीटर अंतरावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या डीआरजी जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. मतदान केंद्र क्रमांक 195 दुरमा हे 3 किमी अंतरावर असलेल्या बांदा येथे हलवण्यात आले आहे. दुरमा येथे 284 मतदार आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत 20 जणांनी मतदान केले होते. सकाळी 11.15 वाजता नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये 10 मिनिटे गोळीबार झाला.