तुम्ही अमेझॉनवरन काही शोधताय का ?
यावर कराल क्लिक
Ncp Leader Joins Bjp साक्षीदार न्युज । राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला ठाणे जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आज (15 एप्रिल 2025) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. दुपारी 3 वाजता मुंबईतील भाजप मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. बरोरांसह त्यांचे शेकडो समर्थक आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत असल्याने शरद पवार गटाला राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. बरोरा यांनी 2014 मध्ये शहापूरमधून आमदार म्हणून विजय मिळवला होता, परंतु 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून लढताना त्यांचा केवळ 1,300 मतांनी पराभव झाला होता.
पांडुरंग बरोरा यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडील महादू बरोरा यांनी शहापूरमधून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत चार वेळा आमदारकी भूषवली होती. त्यामुळे बरोरा कुटुंबाचा शहापूर परिसरात दबदबा आहे. त्यांचा भाजप प्रवेश स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकतो.
सध्या राज्यात पक्षांतराचे वारे वाहत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष बदलत आहेत. बरोरांच्या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, इतर पक्षांमधूनही काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
गिरीश महाजन यांचा पलटवार, एकनाथ खडसे आणि अनिल थत्तेंना अब्रूनुकसानीची नोटीस
आईनेच स्वत:च्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवला
शिक्षण विभागात 570 बोगस शिक्षकांचा पर्दाफाश, 200 कोटींचा घोटाळा
ईव्हीएम हॅकिंगचा दावा: तुलसी गब्बार्ड यांच्या खुलाशाने निवडणूक प्रणालीवर प्रश्नचिन्हसासूला पळवून नेणाऱ्या