‘बिग बॉस १७’ च्या घरात होणार नव्या स्पर्धकांचा प्रवेश !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | नेहमीच टीव्ही मालीकेत चर्चेत असलेल्या अभिनेता सलमान खान याचा बिग बॉस कार्यक्रम पुन्हा एकदा येत्या १७ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहत्यामध्ये मोठी लगबग सुरु झालेली आहे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या शोची गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. कोण कोणते कलाकार स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी होणार याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांसमोर स्पर्धकांची यादी आली आहे.

- Advertisement -

यंदाचं ‘बिग बॉस १७’ स्पर्धकांसह प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. यंदाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी असणार असून यांच्यातील वाद आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला ‘बिग बॉस ओटीटी २’ आलं होतं. या सीझनमध्ये आपल्याला अनेक प्रसिद्ध युट्यूबर दिसले होते. त्याच प्रमाणे यंदाच्या ‘बिग बॉस १७’ मध्ये ही युट्यूबर दिसणार आहेत.

युट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायल मलिक सुद्धा ‘बिग बॉस १७’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने दोन लग्न केले असून त्याच्या दोन्हीही पत्नी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे. त्यासोबतच ‘बिग बॉस १७’मध्ये ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवची एक्स गर्लफ्रेंड सुद्धा येणार आहे. दरम्यान युट्यूबरने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये त्याच्या आणि किर्तीच्या मैत्रीचाही उल्लेख केला होता.

- Advertisement -

सोबतच यावेळी प्रेक्षकांना बरेच युट्यूबर्स पुन्हा एकदा एका मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांचे सोशल मीडियावर फॅन्स लिस्ट सुद्धा प्रचंड मोठी असून ‘बिग बॉस १७’ ला टीआरपीसाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो. अरमान, कृतिका किंवा पायल मलिक, कंवर ढिल्लो, एल्विशची एक्स गर्लफ्रेंड किर्ती मेहरा, फैज बलूच, जय सोनी, संदीप सिकंद यांच्या नावाची सध्या चर्चा होत असून काही नावांवर शिक्कामोर्तब झालेला आहे.

‘बिग बॉस १७’मध्ये स्पर्धेक म्हणून अंकिता लोखंडे आणि विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, इशा मालवीय आणि अभिषेक कुमार, मुनव्वर फारूकी, अनुराग डोभाल उर्फ यूके राइडर, मन्नारा चोपड़ा, जिग्ना वोरा, सनी आर्य उर्फ तहलका प्रैंक, मनस्वी ममगई, ऋषि धवन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान बिग बॉसमध्ये येण्यासाठी अंकिता लोखंडे, तिचा पती विक्की जैन, अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक यांनी चांगलीच तयारी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS