साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | दोन दिवसावर आता मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारला दिलेला वेळ संपत असल्याने आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुढील दिशा ठरवलेली आहे. आपल्या लढ्याची नवी दिशा निश्चित केली असून 24 तारखेला न्याय न मिळाल्यास 25 ऑक्टोंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक नाक्यावर साखळी उपोषण करणार असून हे युद्ध सरकारला पेलणार नाही. असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
24 तारखेला जर न्याय मिळाला नाही तर 25 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तर राज्यभर साखळी उपोषण करणार असून प्रत्येक नाक्यावर उपोषण होईल अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, 28 तारखेपासून आमरण उपोषणाचे रुपातंर हे आमरण उपोषणात करण्यात येईल अशी रणनिती जरांगे पाटलांनी सांगितली आहे. शांततेत सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही, या विषयाची तुम्ही गांभीर्याने दखल घ्या, आणि 24 तारखेपर्यंत आरक्षण लागू करावे अशी मागणी यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.