Karizma बाईकची नवीन व्हर्जन बाजारात लॉन्च ; किमत व फीचर्स !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून देशातील तरुणांच्या स्वप्नातील दुचाकी म्हणून Karizma बाईक उतरली असतांना आता या बाईकचे नवीन व्हर्जन बाजारात लॉन्च केले. या बाईकला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. आतापर्यंत या बाईकला 13,688 बुकिंग मिळाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनीने हिरो डीलरशिप्सकडे गाड्या पाठवल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना गाडीची डिलिव्हरी मिळणे सुरू होईल. हिरोने नवीन Karizma XMR 210 ला 1,72,900(एक्स-शोरुम) रुपयांच्या किमतीवर लॉन्च केले आहे.

- Advertisement -

किंमत वाढली

 

- Advertisement -

या किमतीवर 29 ऑगस्ट 2023 ला बाईकची बुकिंग सुरू झाली होती, पण 30 सप्टेंबर 2023 ला बुकिंग बंद करण्यात आली. यानंतर या बाईकची किंमत 7,000 रुपयांनी वाढवण्यात आली. आता ही बाईक 1,79,900 रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) किमतीवर उपलब्ध आहे. कंपनी लवकरच नवीन बुकिंग विंडोची घोषणा करेल.

इंजिन

नवीन Karizma XMR मध्ये लिक्विड-कूल्ड, 210cc, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 25.5bhp आणि 20.4Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स येईल, जो स्लिप आणि असिस्ट क्लचने सुसज्ज असेल. या नवीन करिझ्माला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रिअरमध्ये प्रीलोड अॅडजस्टेबल मोनोशॉक मिळतील.

फीचर्स

ब्रेकिंग सिस्टीमसाठी बाईकमध्ये 300 मिमी फ्रंट आणि 240 मिमी रिअर डिस्क ब्रेक्स मिळतील. तसेच यात ड्युअल-चॅनल एबीएस स्टँडर्ड आहे. बाईक तीन कलर ऑप्शन्स- आयकॉनिक यलो, मॅट फँटम ब्लॅक आणि टर्बो रेडमध्ये उपलब्ध आहे. नवीन करिझ्मा एक्सएमआर सेगमेंट-फर्स्ट अॅडजस्टेबल विंडशील्ड, इंटेलिजेंट इल्यूमिनेशन हेडलँप आणि टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशनने सुसज्ज असेल.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS