नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | २५ वर्षीय नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना रावेर तालुक्यातील भाटखेडा शिवारातील मेंढपाळ वाड्यातील चिमाबाई देवा कोरडकर असे नाव असून या प्रकरणी अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर शिंदखेडा (जि. धुळे) येथून येत असलेल्या तिच्या आई वडिलांच्या प्रतीक्षेत रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, विवाहितेचे मूळ माहेर भोलाणे (ता. बऱ्हाणपूर) येथील असल्याने तिच्या माहेरातील नातेवाइकांनी मयत नवविवाहितेच्या अकस्मात मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने दोन्ही गट परस्परांशी भिडल्याने रावेर ग्रामीण रुग्णालय परिसर व स्टेशन रोडवर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एकच गोंधळ उडाल्याने फौजदार सचिन नवले व दीपाली पाटील यांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणून शांतता प्रस्थापित केली.

विहिरीवर धुण्यासाठी आलेल्या चिमाबाई देवा कोरडकर (वय २५, रा. मुंजलवाडी ) हिचा पाय घसरून विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. धुरखेडा येथील पट्टीचे पोहणाऱ्यांनी तिचा मृतदेह सुमारे पावणे दोनशे फूट खोल विहिरीतील ७५ फूट पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. दरम्यान, मयत चिमाबाईच्या जेठाच्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत चिमाबाईचे आई-वडील दाखल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS