Beed Tuljapur Highway | NH-52 वर धडकी भरवणारा प्रवास! बीड–तुळजापूर मार्गावरील १० ‘डेंजर झोन’ जाहीर, पोलिसांचा हाय अलर्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Beed Tuljapur Highway | साक्षीदार न्यूज | राज्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यातच धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ (NH-52) वरील बीड ते तुळजापूर दरम्यानचा टप्पा सध्या गुन्हेगारांचा मुख्य निशाणा ठरला आहे. या मार्गावर धावत्या वाहनांवर जबरी चोरी, लुटमार आणि दरोड्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

या वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बीड व धाराशिव पोलिसांसह महामार्ग सुरक्षा पथकाने संयुक्त कारवाई सुरू केली असून प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मार्गावरील मांजरसुंबा घाटासह एकूण १० ठिकाणे ‘धोकादायक हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

संयुक्त ‘बीड ब्रेक’ मोहीम सुरू

गुन्हेगारी घटनांची गंभीर दखल घेत बीड व धाराशिव पोलीस प्रशासनाने एकत्रित ‘बीड ब्रेक’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत महामार्गावर कडक गस्त, संशयितांची तपासणी आणि रात्रीच्या वेळी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. यासोबतच प्रवाशांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

- Advertisement -
कोण होत आहेत गुन्हेगारांचे लक्ष्य?

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी या महामार्गावर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. डोंगराळ, निर्मनुष्य आणि अंधाऱ्या परिसराचा फायदा घेत चोरट्यांच्या टोळ्या प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीने अडवत आहेत.
विशेषतः —

  • लांब पल्ल्याचे मालवाहतूक करणारे ट्रक चालक
  • एकटे प्रवास करणारे चारचाकी वाहन चालक
  • तसेच दुचाकीस्वार

यांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे.

काही ठिकाणी कृत्रिम अपघात घडवून मदतीच्या बहाण्याने वाहन थांबवणे, तर कधी रस्त्यावर खिळे, जॅक किंवा लाकडी ओंडके टाकून वाहन अडवून शस्त्रांचा धाक दाखवून हल्ले केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
विशेषतः बीडमधील मांजरसुंबा घाट आणि धाराशिवमधील येडशी बायपास हे अतिशय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. येथे दुभाजकातील झाडीत गुन्हेगार लपून बसून वाहन अडवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची रणनिती

या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाने विशेष सुरक्षायंत्रणा उभारली आहे.

  • महामार्ग सुरक्षा पथकासह एकूण ७ गस्ती वाहने रात्रंदिवस गस्त घालणार
  • हॉटेल चालक, ढाबा मालक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती देण्याचे आदेश
  • महामार्गालगतच्या गावांतील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दल ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर
  • संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी ड्रोनचा वापर
  • तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रसिद्ध

अशी बहुस्तरीय यंत्रणा राबवली जात आहे.

जाहीर करण्यात आलेले १० धोकादायक हॉटस्पॉट्स
क्रमांक ठिकाण जिल्हा
मांजरसुंबा घाट बीड
चौसाळा बायपास बीड
पारगाव बायपास बीड
सरमकुंडी फाटा बीड/धाराशिव सीमा
इंदापूर फाटा धाराशिव
पार्डी फाटा धाराशिव
घुले माळ उड्डाणपूल परिसर धाराशिव
तेरखेडा ते येडशी टोल नाका धाराशिव
येडशी बायपास धाराशिव
१० धाराशिव ते तुळजापूर धाराशिव

प्रवाशांसाठी अत्यावश्यक सूचना
  • नैसर्गिक गरज किंवा वाहन बिघाड झाल्यास फक्त गर्दी आणि प्रकाश असलेल्या ठिकाणीच थांबा
  • रस्त्यावर संशयास्पद वस्तू किंवा अनोळखी व्यक्ती मदतीच्या बहाण्याने थांबवत असतील, तर गाडी थांबवू नका
  • त्वरित ११२ या क्रमांकावर संपर्क साधा
  • महामार्गाच्या दुभाजकाला खेटून वाहन चालवणे टाळा

प्रवाशांचे सहकार्य आणि पोलिसांच्या वाढीव कारवाईमुळे या गुन्हेगारीवर लवकरच नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Beed Tuljapur Highway

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS