विद्यापीठात रक्तदान शिबिराचे उद्घाटन ; ५१ जणांनी केले रक्तदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दि. १३ एप्रिल रोजी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा.म.सु. पगारे, वित्त व लेखाधिकारी रवींद्र पाटील, प्रा. आर.जे. रामटेके, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष विकास बिऱ्हाडे आदी उपस्थित होते. यावेळी अधिसभा सदस्य सुरेखा पाटील, विद्या परिषद सदस्य प्रा. रमेश सरदार, प्रा. के.एफ. पवार, डॉ. सचिन नांद्रे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात ५१ शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, दैनिक वेतनिक आणि विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

- Advertisement -

शिबीराच्या यशस्वीतेसाठी इंडियन रेडक्रास सोसायटी जळगावचे डॉ. अरविंद चौधरी, रोहिनी देवकर, रूपाली बडगुजर, ज्योत्स्ना बोरसे, मनोज वाणी, मंगेश ओतारी व अमीरभाई यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिराचे समन्वयक अरूण सपकाळे, राजू सोनवणे, जयंत सोनवणे, सुभाष पवार, रेखा धम्मरत्न, विठ्ठल धनगर, निता शिंदे, दिपक गावीत व मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

दुपार सत्रात भिमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम प्रा.घनश्याम थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात सादर केला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास प्रथम नमू गौतमा, शिल्पकार जीवनाचा, माझा समाज विकणार नाही, तुझ्या रक्तामधला भिमराव पाहिजे, भिम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर यासह विविध गीते प्रा. थोरात, रागिनी मराठे, अरूण ढमढेरे, भालचंद्र सामुद्रे, पौर्णिमा व राखी शेंडगे, माधुरी महाजन, सुकन्या जाधव यांनी सादर केलीत. त्यांना स्वप्नील सोनवणे, निलेश मांडलिक, रघुनाथ मराठे, योगेश , यश महाजन यांनी वाद्यवृंदावर साथ संगत दिली. यावेळी विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS