Youtube
साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | बॉलीवूड क्षेत्रामध्ये अनेक अभिनेते व अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. यातील सोशल मिडीयावर सक्रीय असलेली अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर असून ती सध्या सोशल मीडिया आणि युटुयबद्वारे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना ट्रोल केले जाते.
विचित्र पद्धतीने एखाद्यावर टीका केली जाते. एका युटयुबरने सोनम कपूर आणि तिचा पती यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांच्यावर अवमानकारक कंटेट प्रसारित केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता सोनम आणि आनंदने संबंधित युट्युबरच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोनम आणि आनंदने रागिनी नावाच्या युट्युबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. काही दिवसांपूर्वी सोनमनं एका विषयावर वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ घेत युट्युबरने सोनम आणि आनंदला ट्रोल केले होते. त्यानंतर आता या युट्युबरला कायदेशीर नोटिस पाठवण्यात आली आहे. रागिनी नावाच्या युट्युबरने सोनम कपूरचा एका व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने सोनम कपूरचा मुर्ख असा उल्लेख केला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील दुरुपयोग रोखण्यासाठी अनिल कपूर न्यायालयात गेले होते. समाजमाध्यमांवरील प्रकारांमुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचेही कपूर यांनी याचिकेत म्हटले होते. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय देत, सोशल मीडिया आणि संबंधित संकेतस्थळांवर ही नावे, संवाद, व्हिडिओ व आवाजाचा उपयोग अनिल कपूर यांच्या अनुमतीशिवाय करता येणार नाही, असे सांगितले होते.