साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ ; राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ३५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असतांना आता मान्सूनने राज्यातून जवळपास एक्झिट घेतली होती तरीदेखील अनेक भागात अजून पावसासाठी पोषक असं वातावरण दिसून येत आहे. एकीकडे ऑक्टोबर हीटच्या झळा नागरिकांना बसत आहेत. तर दुसरीकडे काही भागात पावसाचं सावट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज, कोकणातील काही भागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे.