साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील सोशल मिडीयावर होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना नुकतेच मराठा समाजाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट एका तरुणाने केली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला आहे. यानंतर सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि घटना हिंगोली येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. या दरम्यान सोशल मीडियावर काही आक्षेपार्य पोस्ट न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. शिवाय पोलिसांचे याकडे लक्ष होते. याच दरम्यान हिंगोलीमध्ये एका तरुणाने सोशल मीडियाच्या फेसबुकवर मराठा समाजाविषयी आक्षपार्ह कमेंट करत समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच कारवाईचे पॉल उचलले. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड गावामध्ये ही घटना घडली असून कळमनुरी पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. सुरेश जांबुतकर असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव असून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं या तरुणाने कृत्य केल्याचं पोलिसांनी या तक्रारीत म्हटलं आहे.