उमरगा । साक्षीदार न्युज । दाळिंब गावाच्या उपसरपंचपदी ओमप्रकाश टिकंबरे यांची निवड करण्यात आली. गेल्या चार वर्ष्यामागे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका मध्ये डाळिंब गावात समाजसेवक बाबा जाफरी यांच्या नेञत्वामध्ये माझा गाव माझा स्वाभिमान प्यानल चे बहुमताने 17 पैकी 16 उमेदवार निवडून आले होते, जास्तीत जास्त सदश्यांना संधी मिळावी या उद्देशाने तीन सरपंच व चार उपसरपंच करण्याचे ठरले होते व त्यांचा कालावधी ठरवून देण्यात आला होता. ठरल्या प्रमाणे तीन सरपंच, व तीन उपसरपंचानी आपला कार्यकाल पूर्ण केला व तिसरे उपसरपंच हिराजी गायकवाड यांनी राजीखुशीने राजीनामा दिला व चौथ्या उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरवात झाली ज्यात ओमप्रकाश टिकंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात अली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी भांगे साहेब त्यांनी कार्यभार पार पाडला. या वेळी झालेल्या सत्कार समारंभात गावातील प्रमुख व्यक्ती सरपंच प्रशांत देवकते,माजी सरपंच पती बालाजी सातपुते माजी उपसरपंच आशिफ शिलार, इरफान जहगीरदार, हिराजी पाटील वं ग्रामपंचायत सदस्य ,गावातील जेष्ठ नागरिक,परमेश्वर अप्पा शेवरे , बाबूराव टिकंबरे, मधुकर गुरुजी, हनुमंत शिंदे सर, खयुम चाकुरे, धीरज इंगळे, दयानंद माळगे, सोमशंकर माळगे, विनोद इंगळे व गावातील बहुसांख्य तरुण व नागरिक उपस्तिथ होते. सत्कार समारंभा नंतर गावातून मिरवणूक काढण्यात अली.